🔥 TRENDING वाराणसी में यूजीसी के विरोध में छात्रो... उन्नाव में मूसलाधार बारिश से जनजीवन अस... LPU Students Protest Against Administr... User Searches for 'deescalatetensions'... TribuneIndia.com Users Search for "Jij... Dr Shiny Devassy featured in Tribune I...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
1/9/2026 पासून NCMC कार्डाची सक्ती

1/9/2026 पासून NCMC कार्डाची सक्ती

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 01 Sep 2026, 09:54 PM 👁 227
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
एसटी बस सवलत प्रवासासाठी आता एनसीएमसी कार्ड बंधनकारक; १ सप्टेंबर २०२६ पासून नवा नियम लागूमुंबई :राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आज, १ सप्टेंबर २०२६ पासून राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (NCMC) अनिवार्य करण्यात आले आहे. या नवीन निर्णयानुसार, आता सवलतीचे तिकीट केवळ या एनसीएमसी कार्डद्वारेच दिले जाणार आहे. नेहमीचे कागदी ओळखपत्र दाखवून प्रवाशांना आता सवलत मिळणार नाही.एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या डिजिटल प्रणालीला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत १ कोटी ११ लाख ७८ हजार ९० प्रवाशांनी एनसीएमसी कार्डची यशस्वी नोंदणी केली आहे.७५ वर्षांवरील ज्येष्ठांना तात्पुरती सवलततांत्रिक अडचणी आणि बायोमेट्रिक नोंदणीमधील समस्या लक्षात घेता, ७५ वर्षांवरील (अमृत ज्येष्ठ नागरिक) प्रवाशांना या नियमातून सध्या तात्पुरती सूट देण्यात आली आहे. ते जुन्या पद्धतीनुसार आधार कार्ड दाखवून मोफत प्रवास करू शकणार आहेत.कार्ड कसे मिळवाल?पात्र प्रवाशांना एसटीच्या प्रमुख बस स्थानकांवर आणि आगारांमध्ये सुरू असलेल्या अधिकृत केंद्रांवर जाऊन आपले आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने हे कार्ड नोंदणी करून घेता येईल. प्रवासादरम्यान वाहकाकडे असलेल्या मशीनवर हे कार्ड स्वाइप करूनच आता सवलतीचे तिकीट दिले जाईल.
Need 24न्युज जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले.
📲Get App